
आमचा ओबीसी समाज सक्षम असून मला खात्री आहे की ओबीसीचा पाहिला आमदार होणार:- डॉ.घुले
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भुम:-परंडा मतदारसंघांमध्ये मागील एक वर्षापासून आरोग्याबाबत, शेतकरी, वंचित, गोरगरीब जनतेसाठी समाजसेवेचा वसा घेतलेले भूमिपुत्र आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांनी परंडा विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ए बी फॉर्म सह उमेदवारी अर्ज आपल्या सर्व समर्थकांसह दाखल केल्यानंतर माध्यमांशी पहिली प्रतिक्रिया दिली,ते म्हणाले की यावेळी मतदारसंघात रासपचा पाहिला आमदार होणार असून आमची कोणाशी स्पर्धा नाही,महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच स्पर्धा आहे.आमचा ओबीसी समाज सक्षम असून मला खात्री आहे की ओबीसीचा पाहिला आमदार होणार आहे. मतदारसंघांमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार पुणे, मुंबई ला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.गेल्या एक वर्षापासून आरोग्य विषयी आपण मागील त्याला मोफत ऑपरेशन त्यामध्ये कॅन्सर,मेंदू,हृदय, हाडाचे सुविधा मिळणार आहेत. शेतकरी यांनाही आपण मोफत डीपी देणार आहोत.गोरगरीब,जनतेसाठी वंचितासाठी सदैव आपण त्यांची सेवा करणार आहोत.यावेळी रासपा जिल्हाध्यक्ष विकास पाटील,पंडित मारकड, गजानन सोलंकर, नाना मदने, भैय्या जानकर प्रल्हाद कुटे,शरद चौघुले,सुनिल ढाकणे,महादेव शेळके,भगवान नागरगोजे,आश्रुबा मारकड,प्रभाकर हाके,एजाज काझी,दादासाहेव मुंडे,कानिफनाथ मोराळे पदाधिकारी,आरोग्य मित्रपरिवार उपस्थित होते.