
चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम- पंरडा विधानसभेचे वंचित बहूजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण रणबागुल यांनी अगदी साध्या पद्धतीने आपला विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी घरातून निघताना त्यांनी आई-वडीलांचे आशीर्वाद घेतले. पत्नी आणि भगिनींने ओवाळून त्यांचे औक्षण केले.
नंतर त्यांनी नळी वडगाव येथील श्री संत बाळूमामा मंदीर येथे जाऊन बाळूमामांचे दर्शन घेऊन यश मिळण्यासाठी आशीर्वाद मागितले. पुढे खर्डा येथील सिताराम गड येथे जाऊन संत सिताराम बाबा, प्रभू श्रीराम, सितामाई, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच संत वामन भाऊ यांचे दर्शन घेतले. तसेच येथील भगवान बाबा मंदिरात जाऊन संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
सोनारी येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिरात जाऊन भैरवनाथाचे दर्शन घेतले व मंदिरातील महाराजांचे आशीर्वाद घेतले.
परंडा तालुक्यातील ख्वाजा बद्रुद्दिन यांच्या दर्ग्याचे दर्शन घेऊन त्यांनी बद्रुद्दिन बाबांच्या मजारीवर चादर अर्पण केली. व मनोभावे बाबांची प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मरजिका महाविहारात जाऊन, त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले. व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
नंतर माणकेश्वर येथील त्यांचे परममित्र व सहकारी मुसाभाई शेख यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.
शेवटी भूम येथील प्रसिद्ध आलम प्रभूंचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वादाची मागितले. येथील गोलाई चौकातून तहसिल कार्यालयापर्यंत चालत जाऊन अगदी साध्या पद्धतीने, कोणताही गाजावाजा न करता जाऊन त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी मित्र तसेच मतदारसंघातील नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.