
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम:-मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी सामाजिक कार्याच्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत परंडा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दि. २८ रोजी भरला आहे.आसिफ जमादार यांच्या उमेदवारीने परंडा विधानसभेसाठी बहुरंगी लढत होईल असे दिसत आहे. ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपले नाव लौकीक केले आहे. याचबरोबर जमादार यांचा तिन्ही तालुक्यासोबत मराठवाड्यात दांडगा संपर्क आहे. युवा असल्याने त्यांच्या मागे मुस्लिम व बहुजन युवक वर्ग ही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.याचा त्यांना नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होणार हे नक्की. यावेळी मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.