प्रत्येकजण राजकिय पक्ष स्थापन करून समाजाचा नेता बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण या स्वयघोषीत नेत्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी समाजाला कोणाच्या दावणीला बांधून समाजाचं अस्तित्व नष्ट करू नका कारण विश्वरत्न महामानव भारतत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढले आणि समाजाला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळवून दिली. कित्येक वर्ष गुलामीत असलेला समाज की ज्या समाजाला माणूस असून देखील माणसा सारख जीवन जगता येत नव्हतं त्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची संधी महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिली. तुम्ही तुमच्या स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाला पुन्हा गुलामगिरीच्या वाटेवर घेउन जावू नका . तुम्हाला कोणासोबत आघाडी करायची असेल तर तूम्ही खुशाल आघाडी करा त्याला आमचा मुळीच विरोध नाही.पण एकमेकाला रोखण्यासाठी एकमेकाच्या विरोधात उमेदवार देवुन समाजाच्या मताची विभागणी करू नका मोठ्या कष्टाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज उभा केला आहे. किती दिवस एकमेका विरोधात लढणार आणि एकमेकाचे पाय ओढणार तुम्हाला बहुजन समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आणायचे असतील तर समाजाच्या मताची विभागणी होणार नाही याची काळजी घेणे गरजचे आहे.
आज आंबेडकर चळवळीला कोणाची दृष्ट लागली कळत नाही.पण एकाच घरात दोन पक्ष स्थापन झाले.आणि समाज द्वित आवस्थेत सापडला आज समाजानी कोणाकडे पाहाव कोणाचा आदर्श घ्यावा. भावाला भाऊ वैरी होत आहे. भावाच्या विरोधात भाऊ उभा केला जात आहे. स्वत:हून विरोधकाला संधी दिल्या जात आहे. आज आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले विधान सभेच्या निवडणुकीत एका पक्षाच्या पेंन्डालला एका भावाचा फोटो त्याच्याच समोर दुसर्या पक्षाच्या पेंन्डालला दुसर्या भावाचा फोटो समाजानी काय आदर्श घ्यावा . समाजाने कुणाकडे जाव. आज समाज द्विद आवस्थेत सापडलेला आहे.नेत्यांनी समाजाला द्विद आवस्थेत ठेवू नये तुम्हाला राजकारण करायचे असेल तर खुशाल करा पण समाजाला एकसंघ ठेवुन राजकारण केलं पाहिजे. नेत्यांना सांगण्या इतके आम्ही मोठे नाहीत पण हे दृष्य विचार करायला लावणारं होते . रोडच्या आलीकडे थांबाव का रोडच्या पलीकडे थांबाव दोन्ही एकाच रक्ताचे नाते. हे चिञ पाहुन डोळ्यातुन खळकण पाणी आले. आणि मनसुन्न झाले काय करावे काय नाही सुचनासे झाले. नेत्यांनी समाजावर ही वेळ का आणली हा विचार मनात आला आणि राहावे वाटत नसल्याने मन मोकळ करण्यासाठी शब्दातुन व्यक्त करावेसे वाटले. तुम्ही पक्ष स्थापन करा त्याला आमचा मुळीच विरोध नाही. कारण संविधानाने तुम्हाला अधिकार दिला. म्हणून समाजाचं आस्तित्व नष्ट करु नका. आज आंबेडकर चळवळीचे तीन तेरा झाले. आणि समाज प्रत्येक राजकीय पक्षात विखुरला गेला. चार पोर हाताशी घेवून समाजाच वाटोळ करु नका, समाजात फुट पाडू नका निळा झेंडा हातात घेवुन फिरल्याने नेता होता येत नाही. तर नेता होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समाजाच्या समस्या सोडवण्याठी पायाला भिंगरी बांधून फिरावे लागते उपाशी तापाशी फिरावे लागते तेंव्हा त्याला नेत्याचं रुप येते आजच्या तरुण नेत्यांनी पीढी घडवण्याच काम केले पाहिजे पीढी कोणाच्या दावणीला बांधण्याचे काम करु नये तूम्ही एकजुट रहा एक मुठ बांधुन राजकारण करा त्यामुळे समाजाची ताकत वाढते समाजाला बळ मिळते तुम्ही दुभंगलात की समाज दुभंगल्या शिवाय राहाणार नाही. आणि समाजात असलेल समाजाच वर्चस्व कमी झाल्या शिवाय राहाणार नाही. म्हणून नेत्यांनी समाजासाठी एक व्हा एकजुटीने राजकारण केलं पाहिजे तरच समाजाची शान आहे यातच तुमचा मान आहे .आणि यातच समाजाचं भलं आहे. नाहीतर समाजाला पहिले दिवस यायला वेळ लागणार नाहीत. आज विरोधक त्याचीच वाट पाहात आहेत. आज उठ सुठ कोणीही येतो मी समाजाचा नेता म्हणून मिरवत आहे. न बोलावता विरोधकाच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. आणि न मागता विविध राजकिय पक्षाला स्वत: होवुन पाठींबा देत आहेत. एकजुटीने नांदत असलेल्या समाजातल्या तरुणांची डोके भडकु नका एका एकाला फोडून विरोधकाच्या दावणीला बाधण्याचे काम आजचे पुढारी करीत आहेत. विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी तुम्हाला समाजाची विभागणी करण्यासाठी गुलामीतून बाहेर काढले नाहीत तर समाजाचा गाढा पुढे घेवून जाण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आणि आपल्या विचाराचे लोकप्रतिनिधी राज्यातल्या राजकारणात, देशाच्या राजकारणात सर्वानी मिळवुन पाठवले पाहिजे. पण आज स्वयघोषीत पुढार्यांनी आपल्या स्वार्थासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानदारी सुरु केली आणि समाजाचा एक एक घटक विरोधकाच्या दावणीला बांधुन समाज खिळ खिळा करण्याचा जनु काय यांनी विडाच उचलला की काय असे आता अनेकांना वाटु लागले आहे. डाॅ. बाबासाहेंनी एका ठिकानी म्हटले आहे. मुझे पढे लिखे लोगोंनी धोका दिया तुम्हाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी समाज घडवण्यासाठी शिकवलं समाज दावणीला बांधण्यासाठी नाही. समाज खिळ खिळा करण्यासाठी नाही. आज बहुजन समाज मोठ्या संकटात सापडला आहे. बहुजन समाज व्यसनाधिन बनत आहे.व्यसनाधिन करण्याचे काम अनेकानी हाती घेतले आहे. समाजाची होत असलेली प्रगती अनेकांना पाहावत नाही. जे समाजाच्या विरोधात निर्णय घेतात त्यालाच पाठींबा देण्याचे काम नेते करीत आहेत.म्हणून आज सर्वच राजकिय पक्षात समाज विखुरलेला दिसत आहे. शिकले तेवढे हुकले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण आज एस.सी , एस.टी, ओबीसी कोठ्यातुन राखीव जागेवरून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सभागृमाहात पक्षाच्या आदेशाशिवाय बोलालयाला त्यांची जिभ उचलत नाही. मग हे लोकप्रतिनिधी आपल्या काय कामाचे सभागृहात निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता नाही. पक्ष प्रमुखाने समाजाच्या विरोधात निर्णय घेतला तरी डोळे झाकूण पाठींबा देण्याची प्रवृती आज राखीव जागेवर निवडुन गेलेल्या लोकप्रतिनिधीची आहे. म्हणून आजच्या तरुनांनो भविष्यातल्या राजकारणाची जबाबदारी तुमच्यावर आहे.म्हणून तुम्हाला विचार करण्याची वेळ आहे. मेढरासारखे कोणाच्या पाठीमागे मानखाली घालून जाण्याची वेळ नाही. तर विचार करुन राजकारण करण्याची वेळ आहे. आज देशाच्या व राज्याच्या राजकारणात एकाच घरातले तीन खासदार आहेत आणि तीन आमदार होणार आहेत याला जगातली सर्वात मोठी घराणेशाही म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकमेकाच्या विरोधात एकाच कुटुबातले निवडणुकीला उभे आहेत पण यांना परका उमेदवार चालत नाही पराभव झाला तरी घरातल्याच माणसाचा होईल निवडून आला तर घरातलाच येईल पण दुर्यांनी केलेला पराभव जिव्हारी लागतो म्हणून परक्या उमेदवाराला उमेदवारी दिली जात नाही. याला राजकारण म्हणतात.हे आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांनी शिकल पाहिजे. पण आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांना एकच माहित आहे. आपण आपल्याच नेत्याचे पाय ओढले तर साहेब आपला मानसन्मान करतील ,साहेब शाबासकी देतील म्हणुन एकमेकाचे पाय ओढण्यात आपलेच नेते पटाईत आहेत. दलित चळवळ संपवण्याचे ज्यांनी काम केले त्याच पक्षाच्या दावणीला कांही नेते बांधले गेले. पण पंचाहात्तर वर्ष झाले तरी दावणीचे नेते सुटायला तयार नाहीत म्हणून तरुण कार्यकर्त्यानी जो नेता सन्मानाने समाजाला पुढे नेण्यासाठी राञन दिवस काम करतो कोणत्या पदाची अपेक्षा करत नाही. सर्व समाजाला घेवून चालतो त्या नेत्यांच्या पाठीमागे खंभीरपणे समाजानी व तरुणांनी उभे राहाण्याची आज गरज आहे.
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार
ता. कंधार जि. नांदेड
मो. ९५६१९६३९३९