
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहूगांव घराच्या दरवाजा का वाजवला याचा जबाब विचारलयाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाचा लाकडी दंडक्याने मारहाण करून खून करण्यात आला.ही घटना शनिवार ( ता.२ ) रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास देहूगाव ( विठ्ठलवाडी ) येथील तळवडे हॉस्पिटल जवळ घडली.
अमोदकुमार मोहित यादव वय -२५ ( रा.राजेश्री पॅकेजिंग कंपनी तळवडे हॉस्पिटल जवळ विठ्ठलवाडी ) मूळ रा. बिहार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी भोगेंद्रकुमार जोखन सदाय ,वय – २३ सध्या ( रा. सणसवाडी ) अपोलो पॅकेजिंग जवळ ,मूळ रा.गंगापूर बिहार असे अटक आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी जयप्रकाश सदाय हा फरार झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांची एक टीम भुसावळला रवाना करण्यात आली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोदकुमार यादव आणि त्याचा सहकारी जीवनकुमार विठ्ठलवाडी येथे तळवडे चौकाजवळ एका पत्र्याच्या शेड मध्ये राहात होते.शनिवार (ता.२ ) रोजी त्या दोघांनी जेवणाची पार्टी केली होती.त्याच वेळी आरोपी भोगेंद्रकुमार सदाय आणि जयप्रकाश सदाय हे तेथे आले.त्यांनी घराला असणारा पत्र्याचा दरवाजा जोरजोराने वाजवला.त्यावेळे अमोदकुमार यादव हा बाहेर आला.आणि दरवाजा एवढ्या जोरात का वाजवला असा जाब विचारला. याचा राग मनात धरून काही वेळाने आरोपी तेथे गेले आणि , अमोदकुमार याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले , आणि त्यानंतर ते दोघे आरोपी निघून गेले.यावेळी जखमी अमोदकुमार यादव यास ,प्रमोदकुमार याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.ही घटना देहूरोड पोलिस स्टेशनला कळताच ते घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर अवघ्या दोन तासात संशयित आरोपी भोगेंद्रकुमार सदाय याला ताब्यात घेतले.तर उपचार सुरू असताना अमोदकुमार यादव याचा रविवारी मृत्यू झाला.या प्रकरणी प्रमोदकुमार कुमार यादव याने देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन वाघमारे , पोलिस हवालदार बाबासाहेब क्षीरसागर आणि विनोद मोहिते यांनी या खुनाचा तपास करून एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून दुसर्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची एक टीम भुसावळला पाठवण्यात आली आहे.