
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकजूट करणारे मनोज जरांगेंनी कुणाला पाडायचं हे अखेर स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर यावेळी जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधत विश्वासघाताचा आरोप केलाय.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जरांगेंनी बैठका घेत मराठा मुस्लीम, दलित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जरांगेंनी निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याचं स्पष्ट केलं.
आता मराठा समाजाने संभ्रमात राहू नका, असं आवाहन जरांगेंनी केलंय. याबरोबरच जरांगेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधत मराठा समाजाला सूचक संकेत दिलाय. इतकंच नाही नाही तर जरांगेंनी विधानसभेसाठी विशेष रणनीती आखलीय. काय आहे ही रणनीती? पाहूयात..
जरांगेंचा विधानसभा प्लान
आरक्षणाची लढाई तीव्र करण्याची तयारी सुरु
10 दिवसात 17 जिल्ह्यांचा दौरा करणार
प्रत्येक गावात सभांचं आयोजन करणार
दौऱ्यात आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार
जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेला मराठवाड्यात भाजपचा सुफडा साफ झाला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने मराठवाड्यात मराठा फॅक्टरवर लक्ष केंद्रीत केलंय.
मात्र जरांगेंनी कुणाला पाडायचं हे मराठा समाजावर सोडून दिलं आहे.
त्यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालणार की भाजप नवा डाव टाकणार? याकडे लक्ष लागलंय.