
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली आहे.
जुलै 2024 मध्ये, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्ते रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा पात्र महिलांना आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जारी केल्यानंतर आता 2 कोटींहून अधिक महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. पाचव्या हप्त्याची रक्कम जाहीर झाल्यानंतर आता सर्व महिला सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरु झाली. 15 ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर 2 लाख 20 हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले. एकूणच लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत 7500 रुपये मिळाले आहेत, पाचव्या हप्त्यानंतर आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, जी लवकरच महिलांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र सरकार पाठवणार आहे.
राज्यातील महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यावर जमा केल्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा सहा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे आणि निवडणुकीनंतर निकाल जाहीर होताच डिसेंबर महिन्यात महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत आता राज्य सरकार महिलांना दरमहा २१०० रुपये देणार असल्याची घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत, यापूर्वी राज्यातील महिलांना ₹1500 चा हप्ता दिला जात होता, तो आता ₹2100 करण्यात आला आहे.