
महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या निवडीवरून चर्चांना उत आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवल्याने मुख्यमंत्री पदावरून पुन्हा रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मात्र मुख्यमंत्री पदावरून अजुनही सस्पेन्स कायम आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय की, एकनाथ शिंदे यांना आता केंद्रात आले पाहिजे.
आठवले पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पद सोडून केंद्रात आले पाहिजे. जर शिंदे मुख्यमंत्री पद सोडत नसतील तर भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायला हवी.
एकनाथ शिंदे यांनी अडिच वर्षात चांगले काम केले आहे. शिंदे यांना आता केंद्रात आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे.