
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्या. 132 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष आहे.
शपथविधी कधी होणार? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.
तसंच मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपचा आग्रह असल्याचं बोललं जात आहे. अशात एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावं, यासाठी आग्रही आहेत. त्याचमुळे नव्या सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे.