
महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. या मुख्यमंत्रीपदावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळतेय.
आणि आजच मुख्यमंत्री पदावर तोडगा निघणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पु्र्वी दिल्लीला रवाना होण्यापुर्वी देंवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत फडणवीसांनी मोठं भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. तसेच आज मंत्रिपदाची लॉबिंग करण्यासाठी अनेक नेत्यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.राष्ट्रवादीचे छगन भुजबळ देखील सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
शिंदे, पवारांच्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आधी मुख्यमंत्री ठरेल त्यानंतर मुख्यमंत्री ठरवतील कुणाला कुठली मंत्रिपद द्यायची आहेत. तसेच महायुतीचा राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला 25 मंत्रिपद तर शिवसेनेला 10 मंत्रिपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 मंत्रीपदे देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत याबातचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
तसेच ईव्हीएमवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.