
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात परभणी हिंसाचार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेली मारहाण यावरुन सध्या राजकारण तापले आहे.
या घटनेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत सोमनाथच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यासोबतच पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे.
यात एका डंपरने ९ जणांना चिरडले आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ल्याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत.