दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
पिंपरी- पुणे मुंबई रस्त्यावर असलेलेभक्ती शक्ती उड्डाणपूल येथे दि २८रोजी दुपारच्या दरम्यान डंपर पलटी झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे मुंबई आणि पुण्याला जोडणारा भक्ती शक्ती ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भक्ती शक्ती उड्डाणपूल येथे काही वेळापूर्वी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी अग्निशामनदल, निगडी पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. डंपर पलटी झालेल्या गाडीतून वाळू सांडलेली असून वाळू भरण्याचं काम चालू आहे. तसेच डंपर बाजूला करण्याचं काम चालू आहे. एका तासांमध्ये सर्व क्लिअर करून पुन्हा रोड चालू करण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.
