दै चालु वार्ता
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहू. वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची
पर्यावरणाला प्रभावित करणाऱ्या तीन घटकातील वृक्ष, प्लॅस्टिक आणि पाणी या प्रमुख विषयांचे गांभीर्य समाजापर्यंत पोहोचविणे व जनजागृतीसाठी देहू नगरपंचायत प्रशासन आणि वृक्षदायी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय पर्यावरणीय व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवेदिता घार्गे यांनी दिली.
माजी कृषिमंत्री स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी
यांनी ही माहिती दिली. देहूत प्रथमच पर्यावरणीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.
रविवार (दि.२९), सोमवार (दि.३०) व मंगळवार (दि.३१) असे तीन दिवस ही व्याख्यानमाला असणार आहे. यात आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, प्रशांतराव अवचट, गणेश शिंदे या व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत. नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन पर्यावरण जोपासना केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एका वृक्षाची लागवड करीत त्याची जोपासना करावी. प्लॅस्टिकचा वापर करू नये. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी योजना राबवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी केले.
