मनोरंजन क्षेत्रात कोण कधी कोणाच्या प्रेमात पडतील हे सांगता येत नाही. सध्या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव एका तरुण अभिनेत्रीशी जोडलं गेलं आहे. 15 वर्षांनी मोठ्या घटस्फोटीत अभिनेत्याला अभिनेत्री डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अखेर सलमान खानने समोर येत या दोघांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे.
बिग बॉस 18 चा सीझन शेवटाकडे प्रवास करतोय. सीझनमध्ये हाट व्होल्टेज ड्रामा, इमोशनल ट्रॅक आणि अनपेक्षित नातेसंबंधांसह पाहायला मिळत आहेत. घरात अभिनेत्री ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्या मैत्रिची चर्चा आहे. दरम्यान ईशा सिंगचं अभिनेता शालिन भानोटबरोबरही नाव जोडलं जात आहे. 15 वर्षांनी मोठ्या आणि घटस्फोटीत शानिलच्या प्रेमात पडलेल्या ईशाला खूप ट्रोल करण्यात आलंय. दरम्यान हे खरं आहे का याचा खुलासा स्वत: सलमान खानने केला आहे.
( ‘बिग बॉस’ मधून मिळालेले पैसे संपले, बॉयफ्रेंडही गेला सोडून, आता अभिनेत्रीची झाली अशी अवस्था)
वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने हा विषय उपस्थित केल्यानंतर ईशा सिंगच्या ऑफ-स्क्रीन आयुष्याविषयीच्या अफवांना वेग आला आहे. त्याने ईशा सिंगला शालिन भानोटसोबतच्या तिच्या जवळच्या मैत्रीबद्दल विचारले.
आगामी वीकेंड का वार भागाचा प्रोमो समोर आल्यानंतर शालिन आणि ईशाच्या नात्याची खूप चर्चा झाली. होस्ट सलमान खान ईशाला शालीनबद्दल चिडवताना दिसत आहे. ईशाने स्पष्टीकरण देत सांगितलं, आमच्यात कोणतंही रोमँटिक नातं नाही. आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. आम्ही एकत्र काम केलं आहे. आम्ही एकमेकांबरोबर खूप स्ट्राँग बॉन्ड शेअर केला आहे. याहून जास्त आमच्यात काहीच नाही. मी त्याला खूप मानते.
