पालघर जिल्ह्याच्या मोखाडा इथे नुकतंच बाळंतीण झालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. पीडित महिलेनं मागील आठवड्यात बाळाला जन्म दिला होता. मात्र डिलीव्हरीनंतर तिच्या निर्माण झालेल्या शारीरिक गुंतागुंतीमुळे महिला मृत्यूच्या दाढेत अडकली.
वेळेवर न मिळाल्यामुळे महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास केला, पण तिचा जीव वाचला नाही.
आशा नामदेव भुसारा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्या मोखाडा तालुक्यातील हॅम्लेट येथील रहिवाशी होती. 26 डिसेंबरला त्यांना बाळंतपणासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी 9 वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच तिने बाळाला जन्म दिला. पण बाळाला जन्म दिल्यानंतर ही महिला मृत्यूच्या दाढेत अडकली. कारण तिला पोस्टपार्टम हॅमरेज रोगाचं निदान झालं. बाळाला जन्म देताना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास याप्रकारची गुंतागुंत वाढते. बाळाला जन्म देताना अनेकदा याच कारणामुळे महिलांचा मृत्यू होतो.
