
तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो मागील 15 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांना नवी ओळख मिळाली.
दिलीप जोशी अनेक वर्ष हिंदी सिनेमात काम करत होते मात्र त्यांना खरी ओळख ही तारक मेहता या शोने मिळवून दिली. पण तुम्हाला माहितीये का तारक मेहता करण्याआधी दिलीप जोशी हे CIDचे खबरी म्हणून काम करायचे. अनेकांना आजवर ही गोष्ट माहिती नसेल.
दिलीप जोशी यांनी साकारलेले जेठालाल आज लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना माहिती आहेत. तारक मेहताच्या आधी दिलीप जोशी यांनी अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
एका दिवसात लाखो रुपये कमावतो जेठालाल; एकूण संपत्ती वाचून येईल भोवळ
अभिनय करत असताना त्यांना एकदा सीआयडीचा खबरी होण्याची संधी मिळाली होती. घाबरू नका सीआयडी म्हणजे खरे सीआयडी नाही तर CID मालिकेत त्यांना काम मिळालं होतं.
सोनी टीव्हीवरील CID या मालिकेत त्यांनी खबरीचा साइड रोल मिळाला होता. तारक मेहता आणि सीआयडीचे अनेकदा कोलाबरेशन एपिसोड झाले आहेत. ज्यात जेठालाल दिसले होते. 19 वर्षांआधी ते सीआयडीचा भाग होते. 2005 साली सीआयडीचा स्पिन ऑफ शो आला होता. “सीआयडी स्पेशल ब्युरो” असं नाव त्याला देण्यात आलं होतं.
हा शो 2005-2006 या साली टेलिकास्ट झाला होता. ज्यात दिलीप जोशी यांनी सीआयडीच्या खबरीचा रोल केला होता. बॉब असं त्यांच्या रोलचं नाव होतं. बॉबचा रोल फार मजेशीर होता. सीआयडी स्पेशल ब्युरोमध्ये दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युमन देखील होते.
सीआयडी स्पेशल ब्युरोचे एपिसोड युट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. 2008 पासून दिलीप जोशी तारक मेहता का उल्टा चश्मा या शोचा भाग झाले.