
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या शारीरीक आणि आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे, याची माहिती तुम्हाला गेल्या काही दिवसात आली असेलच. त्यात आता कांबळीच्या आर्थिक परिस्थितीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
त्यानुसार विनोद कांबळी गेल्या 6 महिन्यांपासून फोन वापरत नसल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर कांबळी आयफोन वापरत होते. या आयफोनच्या दुरूस्तीसाठी त्याला 15 हजार द्यायचे होते. हे 15 हजार देता न आल्याने दुकानदारने त्याचा फोन हिसकावल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
विनोद कांबळी हे सध्या ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या असून त्यांना युरिनरी इन्फेक्शनची समस्या असल्याचेही आढळून आले. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे, मात्र त्याचवेळी त्यांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे सांगून डॉक्टरांनी सर्वांनाच हैराण केले होते. मात्र कांबळीची 80-90% स्मरणशक्ती पुन्हा वाढू शकते, असे डॉ. द्विवेदी यांनी सांगितले आहे.
या आजारांच्या उपचारासाठी विनोद कांबळी यांच्याकडे पैसै नव्हते. मात्र आता अनेक जण विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी समोर आले आहेत. त्यामुळे विनोद कांबळी यांच्यावर उपचार होऊ शकले आहेत आणि त्यांच्या तब्येतीतही सुधारणा झाली आहे.
अशात आता 52 वर्षीय माजी भारतीय क्रिकेटपटू गेल्या 6 महिन्यांपासून फोन वापरत नसल्याची बाब समोर आली आहे. विनोद कांबळी आयफोन वापरत होते. या आयफोनच्या दुरूस्तीसाठी त्याला 15 हजार द्यायचे होते. हे 15 हजार देता न आल्याने दुकानदारने त्याचा फोन हिसकावल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयकडून महिन्याकाठी इतके पैसे मिळतात?
एक काळ असा होता की कांबळीची एकूण संपत्ती 13 कोटी रुपये होती, पण आता बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनमधून त्याच्या कुटुंबाचा खर्च चालतो. तुम्हाला सांगतो की, माजी क्रिकेटपटू असल्याने बीसीसीआय त्यांना मासिक 30 हजार रुपये पेन्शन देते. कांबळीची पत्नी अँड्रिया हेविट हिने अलीकडेच खुलासा केला होता की, त्यांची गृहनिर्माण संस्था 18 लाख रुपयांच्या देखभाल शुल्कासाठी तिला त्रास देत आहे. एका राजकीय पक्षाने 5 लाख रुपयांची मदत देऊ केली होती, मात्र ही फी भरण्यासाठी पुरेशी नाही.
एवढ्या अडचणी असतानाही विनोद कांबळीने सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारला असून तो हॉस्पिटलमध्ये नाचतानाही दिसला. कांबळीने सांगितले की, केवळ त्याच्या चाहत्यांच्या आणि जवळच्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंत आयुष्याचा प्रवास करू शकलो आहे.