
मुंडेंचा पत्ता कट, CM फडणवीसांचे धक्कातंत्र, बीडचा पालकमंत्री ठरला..?
बीडच्या पालकमंत्री कोण असणार, याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले.
त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडचा पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असून चुलत भगिनी आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनादेखील संधी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. धनजंय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, बीडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून घेतला.
बीडचा पालकमंत्री कोण होणार?
बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती केली गेली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरण भोवलं…
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरण भोवलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात होते. वाल्मिक कराड जवळपास 22 दिवस फरार होता. अखेर त्याने खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड याचे निकटवर्तीय असून त्याच्या इशाऱ्याने हत्या झाली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता.