आमदार जितेंद्र आव्हाड भडकून काय म्हणाले..!
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. आता त्याच्या वाहनाचा संबंध थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लावला जात आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा आरोप केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर मध्यरात्री त्यासंदर्भात पोस्ट करून वाल्मिक प्रकरणाबाबत काही खळबळजनक दावेही केले आहेत. (jitendra awhad remembers gopinath munde over walmik karad surrender case)
31 डिसेंबरला दुपारी वाल्मिक कराड शरण आला आणि त्यानंतर संध्याकाळी त्याला बीडमध्ये आणून रात्री उशीरा केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सगळ्या नाट्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे.
आव्हाड म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल स्पष्टपणे सांगतात की, जर एखाद्या महत्त्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायचा असेल तर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकते. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात आले. वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर होणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते. वाल्मिक कराडला कधी केजला नेणार, याचीही माहिती लोकांना होती. त्यामुळेच पुणे आणि केज येथे अराजकता माजवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल स्पष्टपणे सांगतात की, जर एखाद्या महत्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायचा असेल तर त्याला व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकते. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात आले. वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर होणार, हे सबंध…
एवढी अराजकता आणि एवढी दहशत मला वाटत नाही, मुंबईच्या गँगवॉरमध्येही कुणी माजवली असेल! मला बीडमधील लोकांना आठवण करून द्यायची आहे की, मुंबईत अनाचार, अराजकता माजवणारा अंडरवर्ल्ड आणि त्यांचा गँगवॉर जर कुणी संपविले असेल तर त्यातील एक नाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे होते. गँगवॉर संपवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या बीडमध्येच जर दहशत माजवण्याची आणि गँगवॉरची अशी तयारी होत असेल, तर ती इटलीमधील माफियांना लाजवेल इतकी भयानक आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जी गाडी होती , तीच गाडी आरोपी पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वापरतो, हे तर गणित कधीच न सुटण्यासारखेच आहे.
दरम्यान, मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अजित पवार मस्साजोगला आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तसेच हिवाळी अधिवेशनावेळी वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये होता असाही दावा खासदार सोनवणे यांनी केला आहे.
