
अजित पवारांनी घेतली थेट अमित शाहांची भेट
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणासंबधी खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत.
यावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणीने जोर धरला आहे. यातच आता अजित पवार यांनी दिल्लीत धाव घेत बुधवारी अमित शाह यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी तब्बल सव्वा ते दीड तास चर्चा केल्याची आहे. Ajit Pawar Meets Amit Shah |
परंतु या भेटीदरम्यान नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. बुधवारी रात्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले. सर्वप्रथम ते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर अजित पवार प्रफुल पटेल यांच्यासह अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक चालली.
भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर झाली चर्चा?
दरम्यान, दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अजून केंद्रात एकही मंत्रिपद मिळालं नाही. फेब्रुवारी महिन्यात केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असून त्यापूर्वी मंत्रिपद मिळावं यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटल्याची देखील चर्चा आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देखील अजित पवार हे अमित शाह यांना भेटले असण्याची चर्चा आहे.
मात्र या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढला असून या अनुषंगानेही चर्चा झाल्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.