
बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
अख्ख्या महाराष्ट्रात शरद पवारांची बारामती कायम चर्चेचा विषय असते. आता आणखी एका कारणामुळे बारामती चर्चेत आले आहे. कारण बारामतीमध्ये मॅकडोनाल्डचे आऊटलेट सुरु झाले आहे.
इरा पवार यांनी बारामतीमध्ये McDonald आऊलटलेट सुरु केले आहे.
इरा पवार यांच्या McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार असा सारा गोतावळा जमला होता.
इरा पवार या आमदार रोहित पवार यांची चुलत बहीण आहे. त्या राजेंद्र पवार यांचे बंधू रणजीत पवार यांच्या कन्या आहेत.
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मॅक डीच्या आऊटलेटला भेट देऊन इरा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील पहिल्यावहिल्या McDonald आऊटलेची पाहणी केली.