CID ने केला खळबळजनक खुलासा
केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरातून आंदोलन केले जात आहे.
याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सुरुवातीपासून केला जात आहे. त्याच्यावर मकोका कायद्याअंर्तगत कारवाई करावी, या मागणीसाठी अनेक आंदोलने केली गेली. पण आता तपासादरम्यान CID ने खळबळजनक खुलासा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID ने आता वाल्मिक कराड नाही तर सुदर्शन घुले याला गँगचा मुख्य सूत्रधार दाखवलं आहे. तसेच कराडला या गँगचा सदस्य दाखवलं आहे. CID च्या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता देशमुख कुटुंब काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Sudarshan Ghule is Gang leader
दरम्यान, या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि अटक केलेल्या इतर आरोपींकडून देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत.
