
बालकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे गरजेचे
पोलिस आयुक्त चौबे यांचे प्रतिपादन : तळेगावात बालस्नेही कक्षाचे उद्घाटन
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेले तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन दि १८ रोजी बालस्नेही कक्षाचे उद्घाटन करण्यात आले
“गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी मुलांना हवे असलेले निकोप वातावरण देणे गरजेचे आहे. बालस्नेही कक्ष स्थापन झाला म्हणजे सर्वकाही झाले. असे नव्हे तर त्याच्या माध्यमातून पोलिस अधिकारी, कर्मचारी मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी प्रशिक्षण व परिश्रम घेतील,” असा आशावाद पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शनिवारी (ता. १८) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या सातव्या बालस्नेही
पोलिस कक्षाचे उद्घाटन चौबे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव, जी स्टॅम्प कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी अजय चौधरी, होप फॉर द चिल्डेन फाउंडेशनच्या संस्थापिका कॅरोलिन ऑडॉयर डी वॉल्टर, सीएसआर प्रमुख नीतू गुप्ता, प्रकल्प प्रमुख शकील शेख, समन्वयक अश्विनी हेंद्रे, रुपाली धामणकर आदी उपस्थित होते. बालस्नेही कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी प्रास्ताविकात
बालस्नेही पोलिस कक्षाची संकल्पना विस्तृतपणे मांडली. बालस्नेही पोलिस स्थानक मार्गदर्शक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
चौबे म्हणाले, “आजकाल कुणालाही कुठलीही अडचण आली; तर प्रथम प्रतिसादक म्हणून पोलिस कर्मचारी सर्वात पुढे आलेले आहेत. समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांसह घरातील नवरा-बायकोची भांडणे, मुलांवरील अत्याचार असोत कुठल्याही अडचणीत लोक पोलिसांकडे धाव घेतात आणि पोलिस सगळ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत
असतात. पोलिस प्रशासनात तीस टक्के महिला अधिकारी, कर्मचारी नियुक्तीचे उद्दिष्ट्य पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.”
शकील शेख म्हणाले, “मुले केंद्रित बालस्नेही कक्ष प्रथमच पाहायला मिळत आहे. वाढत्या बाल गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तसेच बाल लैगिंक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात वेगळे वातावरणात तयार करणे आवश्यक आहे.”
नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी माळी हिने मनोगत व्यक्त केले. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी
बालासाही पात्रास स्टेशन तळणा
नवलाख उंबरे (ता. मावळ) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील बालस्नेही पोलिस कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे. शेजारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, अजय चौधरी, कॅरोलिन ऑडॉयर डी वॉल्टर आदी मान्यवर.
आभार मानले. ऋषिकेश डिंबळे यांनी सूत्रसंचालन केले. बालस्नेही कक्ष प्रमुख तथा पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कांबळे, उपनिरीक्षक स्वाती घुगे यांच्यासह पोलिस पाटील शंकर अंभोरे जयदत्त शिंदे महेश शिंदे सपना घोजगे शितल चव्हाण उपस्थित होते
विशेष
बाल पोलिस पथक, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय गुन्हे शाखा आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पाटोळे कार्यक्रमाचे नियोजन केले.