
कराडच्या सर्व जगंम मालमत्ता जप्त होणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जात आहे. वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे. एकीकडे खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणी वाढत असताना आणखी दणका कराडला बसण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे.
वाल्मिक कराड हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोपी त्याच्यावर होत आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांतील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती एकत्र केली जात आहे. या सर्वाचा त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, अशी माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराडच्या नावावर बीडमध्ये अनेक जमिनी असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अलिशान सोसायट्यांमध्ये पत्नीच्या नावावर फ्लॅट असल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय हडपसरमध्ये एका व्यावसायिक इमारतीत एक संपूर्ण माळा वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांना आरोप केला होता
वाल्मिक कराड रुग्णालयात
वाल्मिक कराडला बुधवारी कराड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीड कारागृहात नेल्यानंतर कराडने पोटदुखीची तक्रार केली. यासंदर्भात कारागृह प्रशासनाने बुधवारी रात्री बीड सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले. यानंतर कारागृहात डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी करून औषधे दिली. मात्र वेदना कमी होत नसल्याने बुधवारी रात्री कराडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.