
आता आंबेडकर आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली आहे. तुम्हाला ही फॅशन काय असते ते दाखवतो. पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणीही करण्याचे धाडस दाखवले नव्हते. आज ते धाडस दाखवायला लागेल आहे.
त्यामुळेच त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम ज्या महामानवाने, महाराष्ट्राच्या सुपुत्राने केले, त्या महाराष्ट्राचे हे कर्तव्य आहे की जे संविधानाचा अपमान करत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते मुंबईत बोलत होते.
मुंबईतील दादर परिसरात आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमिताने त्यांनी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. “उत्साहाला उधाण आलं आहे. कारण भगवा रंगचं तसा आहे. मी परवा बोललो, जास्त काही बोललो नाही, थोडं राखून ठेवलं. पण तेही बोलून टाकेन. मधल्या काळात भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला. पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही, तो येऊ शकत नाही. कितीही शतक झाली असतील, हजारो वर्ष झाली तरी आपल्या हिंदुत्वाचा आणि शिवछत्रपतींचा भगवा हा कायम हा तेजस्वी राहिला आहे आणि तो तसाच राहील,असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुर्देवाने या देशाचे स्वातंत्र्य गेले
ज्या ज्या वेळी तिरंग्यावर किंवा देशावर संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेला आहे. आपल्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष झाली. काही जणांच्या स्वातंत्र्याला १० वर्ष झाली. पण ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काढीचाही संबंध नव्हता, त्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे, घरादारावर निखारे ठेवणं काय असतं हे ज्यांना माहिती नाही, त्यांच्या हातात दुर्देवाने या देशाचे स्वातंत्र्य गेले आहे”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात उतरला नाही, संयुक्त लढ्यात उतरले नाहीत,ते वाटेल तसं याचा अर्थ लावत आहेत. पण उद्या आपण संविधान स्वीकारलं त्याला उद्या ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. आता आंबेडकर आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली आहे. तुम्हाला ही फॅशन काय असते ते दाखवतो,असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
दरवाजे ठोकून हात आता दुखायला लागले
पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणीही करण्याचे धाडस दाखवले नव्हते. आज ते धाडस दाखवायला लागेल आहे. त्यामुळेच त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम ज्या महामानवाने, महाराष्ट्राच्या सुपुत्राने केले, त्या महाराष्ट्राचे हे कर्तव्य आहे की जे संविधानाचा अपमान करत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. ते कर्तव्य आपल्याला आता भगवा हातात घेऊन करावंचं लागेल. आज २५ जानेवारी हा मतदार दिन असतो. पण मतदानाची काही किंमत शिल्लक राहिलेली नाही. ईव्हीएममध्ये घोटाळा होतो की नाही, ही तांत्रिक बाब आहे. आपले मुलभूत अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० पेक्षा जास्त जागा हव्या होत्या. सुदैवाने हे झालं नाही. पण संविधान मानतंय कोण, गद्दारी करुन शिवसेना फोडली त्यालाही अडीच ते तीन वर्ष झाली. आमचे दरवाजे ठोकून हात आता दुखायला लागले. लोकशाही या देशात शिल्लक राहिलीय की नाही, हाच प्रश्न पडलाय,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
जागे राहा, तत्पर राहा
मतदान केंद्रातील व्हिडीओ शूटींग तुम्हाला मिळणार नाही, हे आणखी भयानक आहे. मग या प्रकराला पुरावा की गाडावा हे तुम्ही ठरवा. अशा लोकांना जागा दाखवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी महाराष्ट्र तत्पर आहे हे दाखवून दिलं. जर स्वकीय भारतमातेला साखळदंडात पुन्हा बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर ती तोडण्याची जबाबदारी आपली आहे. आज मी त्या सर्वांना इशारा देतोय. जागे राहा, तत्पर राहा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.