
जॉस बटलरने उघड उघड दिलं क्रेडिट
चेन्नईच्या चेपॉकवर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 2 विकेट्सने पराभव करून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
तिलक वर्माच्या (Tilak Varma) आक्रमक आणि संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने दणक्यात विजय नोंदवला. अशातच पराभवानंतर इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर (Jos Buttler) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
तिलक वर्माला क्रेडिट – जॉस बटलर
खूप चांगला गेम झाला. सर्व क्रेडिट तिलक वर्माला द्यावं लागेल. आमच्याकडे अनेकदा संधी आली अन् खेळाडूंनी ज्याप्रकारे मेहनत घेतली, ती खरोखर चांगली गोष्ट होती. आम्हाला अपेक्षित असलेली आक्रमकता सामन्यात दिसून आली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभा केली, असं जॉस बटलर म्हणाला.
जेमी स्मिथ मस्त खेळला – जॉस बटलर
जेमी स्मिथने पदार्पणाच्या सामन्यात ज्याप्रकारे खेळ केला, ब्रेडन कार्स आणि त्याच्यासोबत धागेदारी केली, ती खरोखर आमच्यासाठी महत्त्वाची होती, असं जॉस बटलर म्हणाला आहे. आपण नक्कीच चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ज्यापद्धतीने आम्ही खेळलो, त्यावर मी खूप आहे, असं मत कॅप्टन बटलरने मांडलं आहे.
कसा झाला सामना?
पहिली बॅटिंग करणाऱ्या इंग्लंड टीम इंडियासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले होतं, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. सलामीची जोडी संजू समसॅन आणि अभिषेक वर्मा दोघेही अनुक्रमे 5 आणि 12 धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवलाही काही चांगलं काम करता आलं नाही. भारताने 78 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. पण तिलक वर्मा अखेरपर्यंत खेळला अन् विजय घेऊन आला.
दरम्यान, इंग्लंडकडून बटलरने 30 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावा केल्या. बटलर सोडून जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्से यांनी अनुक्रमे 22 आणि 31 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.