
दौंडमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करून मारण्यासाठी विद्यार्थ्याने दिली शंभर रुपयांची सुपारी
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने पिंपरी चिंचवड हादरलं; दारूच्या नशेत नराधमांनी साधला डाव
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार दौंडमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करावी अशी सुपारी दिल्याचे सांगितले जात आहे. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण दडपण्याचा शिक्षक आणि मुख्यध्यापकांकडून करण्यात आला. त्यानंतर आता या प्रकरणी वर्गशिक्षक आणि मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे माजी उपमहापौराच्या सुपुत्राची मुजोरी; कारला धक्का लागला म्हणून दुचाकी चालकाला मारहाण
वाढत्या गुन्हेगारीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागात गुन्हेगारी घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आरोपींवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
शुभदाचा खून एकट्या कृष्णाने नाही, ‘100 बघ्यांनीही’ केलाय!
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या आवारात एका तरूणाने तरूणीची आर्थिक वादातून दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून हत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शाळेतील विद्यार्थ्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारून टकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.