
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
ठाणे – ठाणे महानगर पालिका उपायुक्त शंकर पाटोळे (अतिक्रमण विभाग) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. त्यांनी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजीत कदम यांच्याकडून आधीच १० लाख रुपये स्वीकारले होते आणि अलीकडेच त्यांना २५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.
सायंकाळी ६:५० वाजेपर्यंत, एसीबीचे अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित होते. एसीबी पुढील तपास करत आहेत.