
एसपींनी थेट लक्ष घालावे; फडणवीसांचा कडक इशारा!
कंपन्यांना त्रास देणाऱ्या वसुली करणाऱ्या पोलीस किंवा कार्यकर्त्यांना थेट मकोका लावा असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला
ते पुण्यामध्ये आज विविध प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याचा व्याप आणि विस्तार मोठा असल्याने पुण्यातून पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता या आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन पार पडलं. या हे देशातील सर्वांत आधुनिक पोलीस आयुक्तालय हे पिंपरी चिंचवडचं असणार आहे. अजित पवारांच्या अस्थेटीक सेन्समुळे या इमारतीच्या डिझाईनमध्ये मदत झाली. असं म्हणत फडणवीसंनी यावेळी पवारांचं कौतुकही केलं.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सरकारी कार्यालयांच्या इमारती जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही पिंपरी चिंचवडची इमारत सीएसआरच्या माध्यमातून आपण बांधू शकत आहोत. मात्र या परिसरातील कंपन्यांना गुंडांकडून त्रास होत होतो. ब्लॅकमेलींग, वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येतात. हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे त्यात आमचे असो किंवा कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्ते असो त्यांच्यावर थेट मकोका सारखीच कारवाई करायची असा दमच यावेळी फडणवीसांनी भरला आहे.
शेवटी ते म्हणाले की, या इमारतीच्या उद्धाटनाला देखील मी आणि अजित पवार लवकरच येऊ. त्यावेळी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही घेऊन येऊ असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.