
आमदार सुरेश धस यांची मोठी मागणी!
आका वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांची नार्कोटिक्स करा, त्यातून बरच काही बाहेर येईल अशी मागणी करत भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख हल्ल्याप्रकरणी भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
दोन महिने उलटले तरी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. किंबहुना अशोक मोहितेंवर हल्ला करणारे ही याच टोळीचे सहकारी आहे, असा दावाही आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
अशोक मोहितेंवर हल्ला करणारे ही याच टोळीतले- सुरेश धस
अशोक मोहिते यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अटक करण्यात आलेले आरोपी हे कृष्णा आंधळे याचे सहकारी असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला आहे. म्हणून आका आणि त्यांच्या गॅंगचा माज अद्याप संपलेला नसल्याचे यातून दिसून येत असल्याचे ही सुरेश धस म्हणाले.
लवकरच उज्वल निकम यांची नियुक्ती होईल
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मसाजोग ग्रामस्थांनी भाजपा आमदार सुरेश धस यांची नुकतीच भेट घेतलीय. या भेटीदरम्यान आतापर्यंत झालेल्या तपासा संदर्भात चर्चा करण्यात आली. आम्ही दोघांनी चर्चा केली असून या प्रकरणात कोणताही कसूर राहू नये. आका आणि त्याचे सहकारी वेळप्रसंगी आकाचे आकाचाही या प्रकरणात तपास सुरू आहे. यात कोणीही सुटता कामा नये, अशी चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख याला सर्व ओळखायचे, माझ्या पक्षातील तो बूथ प्रमुख होता. त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली. त्यात कोणताही कसूर राहू नये. यावर चर्चा केली आहे. तर उद्या किंवा परवा उज्वल निकम यांची ऑर्डर निघेल. अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
अशोक मोहिते गंभीर आहे. त्याच्यावर ज्यांनी वार केले त्याला सुट्टी देणार नाही. अशोकला संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो यामुळेच मारले. एवढी मस्ती आणि माज अकाच्या लोकांचा असून तो अद्याप गेला नसल्याचं धस यांनी म्हटले आहे.