
अरविंद केजरीवालांच्या पराभवावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया…
शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात तब्बल 27 वर्षांनी भाजपला दिल्लीत बहुमताने सत्ता मिळवण्यात यश आलं असून मागील तीन वेळा विधानसभा जिंकून दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला चांगलं यश मिळालेलं नाही.
तर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत खात सुद्धा उघडता आलेलं नाही. आम आदमी पक्षाला बसलेला मोठा धक्का म्हणजे त्यांचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निवडणुकीत झालेला पराभव. यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला याच कारण सांगितलं आहे.
अरविंद केजरीवाल हे कधीकाळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सहकारी होते. मात्र अरविंद केजरीवालांनी राजकीय पक्ष काढल्यापासून दोघं वेगळे झाले. माजी मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता त्यांना नाकारल्याचं दिसत आहे आज जो कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे तो दारूच्या दुकानांना दिलेली लायसन्स आणि त्यातून मिळालेले पैसे याचा परिणाम आहे.
केजरीवालांचा पराभव का झाला?
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “दारू त्यांच्या डोक्यात शिरली, दारूचं दुकान डोक्यात शिरलं. जशी करणी तशी भरणी. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले हे कितपण योग्य आहे. याबाबतचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्यांना पत्र सुद्धा लिहिलं मात्र त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही.