
मंत्री नितेश राणेंचा खोचक सवाल ?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची राजधानीत तब्बल २७ वर्षांनी सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. दिल्लीतील भाजपच्या या अभूतपूर्व यशानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्राचे मत्सउद्योग मंत्री नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काँग्रेसचा दारूण पराभव दिल्लीत झाला असून त्यांच्यावर नितेश राणे यांनी टीकास्त्र डागले आहे.
दिल्लीत भाजपने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. आधी हरियाण, मग महाराष्ट्र आणि आता दिल्ली, आज पूर्ण देश हा मोदींच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसत आहे. दिल्लीच्या विजयाने त्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी माध्यमांना दिली.
कालपासून जे 3 इडियट्स आले, काल ती माकडं जे काही बोलायचा प्रयत्न करत होते, आज ती माकडं कुठे गेली ? असा खोचक सवाल राणेंनी यावेळी बोलताना उपस्थित केला. राहुल गांधींच्या पक्षाचा तर एकही उमेदवार निवडून आलेला दिसत नाही, अशा शब्दांत नितेश राणेंनी काँग्रेसवर हल्ला चढविला. ते ईव्हीएमवर बोट ठेवतात. लोकांची मनं जिंकायची नाहीत, आणि नुसतं ईव्हीएमबाबत बोंबलायचं, अशी टीका त्यांनी केली.