
ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया !
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवलाय. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झालाय. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिलीय.
निकालावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानलेत. दिल्लीत विकासाचा विजय झालाय. सुशासनाची विजय झाला. दिल्लीच्या विकासात आम्ही कोणतीच उणीव ठेवणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या विजयावर एक पोस्ट लिहिलीय. जनशक्ती, सर्वोपरी! विकासाचा विजय झालाय. सुशासन जिंकलय. भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील बंधू आणि बहिणींचे आभार. तुम्ही जे भरपूर आशीर्वाद आणि स्नेह दिलंय त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. दिल्लीचा चहूबाजुंनी विकास करून येथील लोकांचे जीवन उत्तम करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. ही आमची गॅरंटी आहे. यासह विकसीत भारत निर्माण करण्यात दिल्लीची मोलाची भूमिका असेल.
याचबरोबर पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा गर्व आहे. भाजपला मोठं मताधिक्य मिळावे यासाठी त्यांनी दिवस-रात्र काम केलं. आता आम्ही अजून सशक्तपणे दिल्लीकरांची सेवा करू असं मोदी म्हणालेत.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया काय?
दिल्लीतील सत्ता हातून निसटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की विजय उमेदवार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत जनतेसाठी केलेले काम त्यांच्यासमोर आहे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय. आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाहीय, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.