
राज्यात बीडमधील सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट सांत्वन केले.
देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग करु नये, त्यांचा लढा आता मी लढणार आहे असे आश्वासनही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले. बीडमधील गुंडागर्दी संपली पाहिजे. तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो पण फरार कृष्णा आंधळे सापडत कसा सापडत नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशमुख कुटुंबाच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या मी लढणार आहे. खासदार बजरंग सोनावणे आणि मी स्वत: आठ दिवसांपूर्वी अमित शहांना भेटल, ते जातीन लक्ष घालतो म्हणाले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागितला आहे. कुणीही गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे, देशमुख कुटुंबिय किंवा कुणीही आता अन्नत्याग करु नये, पण वेळ पडल्यास आम्हीही अन्नत्याग करु. सत्याचाच विजय झाला पाहिजे असं सुळे म्हणाल्या. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींचा सीडीआर मिळायला हवा. आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे त्याला अटक कधी होणार? तो सापडत कसा नाही. पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत पत्रकार परिषद का घेतली नाही असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला. बीडमधील गुंडागर्दी थांबली पाहिजे. बीडमध्ये कुणावरही हल्ला झाल्यास मला फोन करा असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
आम्हाला या प्रकरणात दिवसाआड या अपडेट पाहिजे. साठी अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाम मागणी आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
बीडमधील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. हा लढा केवळ तुमचा आमचा नाही तर सगळ्यांचा आहे. महिलांनी हा लढा हातात घ्यायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.