
वेगळा संशय व्यक्त करत म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांसोबत गैरवर्तवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला.
या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एक वेगळा संशयही व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड काढली. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी आक्रमक पावित्रा घेत तक्रार दाखल केली. यानंतर रक्षा खडसे यांनी नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत मुक्ताबाईंची यात्रा असते. त्या यात्रेनिमित्त अनेक लोक सहभागी होत असतात. परवा रात्री मी गुजरातला होते. आज सकाळीच मी इथे आली. परवा माझ्या मुलींचा फोन आला, त्यांनी मला यात्रेत जायचं असं सांगितलं. मी त्यांना सांगितल की सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन जा. तसेच तुझ्या मैत्रिणी आणि ऑफिसमधील दोन तीन लोकांना सोबत घेऊन जा. कारण दरवर्षी गर्दी असते. धक्काबुक्की होते. त्यामुळे थोडी सुरक्षा असायला हवी. पण तिथे गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी त्यांचा पाठलाग केला, असे रक्षा खडसेंनी म्हटले.
त्यांच्या पाळण्यात शेजारी जाऊन बसले. आमच्या सुरक्षारक्षकाने त्यांना दुसऱ्या पाळण्यात बसवलं, तर तिथेही ही टवाळखोर मुलं त्यांना त्रास द्यायला लागले. तसेच सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. मुलींचीही छेड काढली. सत्ता कोणाचीही असो, शेवटी प्रशासनाकडे जेव्हा तक्रार येतात, तेव्हा गंभीर कारवाई झाली पाहिजे. माझ्या मुलींसोबत पोलीसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलली, त्यांनीही सूचना दिली आहे, अशी माहिती रक्षा खडसेंनी माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वेगळाच संशय व्यक्त केला. आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुर्दैवाने त्यात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काहींना अटक केली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.