
तातडीने रुग्णालयात हलवलं, डॉक्टर काय म्हणाले ?
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून याआधीही अनेकदा प्रकृतीच्या कारणास्तव जरांगेंना छत्रपती संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे .मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करत आहेत . (Health Update)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मनोज जरांगे यांना प्रचंड ताप आला असून अस्वस्थ वाटत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे .डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतरच त्यांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला .दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेत त्यांनी रविवारी गुंड मित्र आणि मित्रांची टोळी वाचवल्याचा सरकारवर गंभीर आरोप केला. धनंजय मुंडेंना क्लिनचीट दिल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. पुण्यातील खेडमधून ते बोलत होते.
काय म्हणाले मनोज जरांगे?
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवून धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं नाही. सरकारनं पद्धतशीरपणे गुंड मित्र वाचवला. गुंड मित्राची टोळी वाचवली. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर केलाय. उज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये नव्याने सहआरोपी वाढतील असे संकेत आमदार सुरेश धसांनी शनिवारी दिला होता. मात्र, आता या प्रकरणात नव्याने आरोपी दाखल होतील यावर शंका असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. पुण्यातील खेडमध्ये ते बोलत होते. आता खून खंडणी जमिनी बळकविण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. (Manoj Jarange) संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाल्याने पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे पाटलांनी दिलेत.
छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकिय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाचा प्रामणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणे त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र, पुढील तपासात काही सहआरोपी होतात का पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणा-या टोळीकडे आमची मोहिम असेल असे मनोज जरांगे म्हणाले.