
दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी- हाणमंत जी सोमवारे
समावेशित शिक्षणासाठी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन
_________________________________
लातूर (अहमदपूर) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘स्टार्स व समग्र शिक्षा’ अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 मध्ये विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
याच अनुषंगाने डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अध्यापक विद्यालय, अहमदपूर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड (लातूर) येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री ठाकूर तसेच समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक सुनीलजी राजुरे यांनी सदिच्छा भेट दिली. त्याचप्रमाणे, रेणापूर तालुक्याचे समावेशित शिक्षण तालुका समन्वयक हनुमंत बाशिंगे यांनीही या प्रशिक्षण स्थळी भेट देऊन उपस्थित शिक्षक व प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या वेळी प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख श्रीमती कामाक्षी पवार मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रशिक्षणात उपस्थित शिक्षक व सदस्यांनी मान्यवरांचे उत्साहाने स्वागत करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांपर्यंत समावेशक शिक्षण पोहोचविण्याचे तंत्र आणि शिक्षकांनी स्वीकारायच्या नवीन अध्यापन पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रेरणादायी संवादामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
हा उपक्रम शिक्षकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्ञानात व अध्यापन कौशल्यात अधिक वृद्धी होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.