
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोल्डन सियारा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी भारत स्काऊट-गाइडअंतर्गत राज्य पुरस्कारासाठी 12 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. स्कूलसाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती खणगे यांनी दिली.
रामबाग (ता. भोर) या ठिकाणी गाईड विभाग व स्काऊट विभागाच्या राज्य पुरस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये तोंडी, लेखी व प्रात्यक्षिक अशा एकूण ३०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये- ज्ञानेश्वरी गोठे, त्रिशा रेड्डी, समीक्षा हिवरकर, शरयू ढमाले, जानू बिक, राधा बिका, साईचरण चव्हाण, रितेश लोंढे, जयेश म्हेत्रे, अनुकल्प शेळके, वेदांत शिर्के, मनकुश माळी हे विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र झाले आहेत.
त्याचबरोबर डायमंड जुबली जांबोरी तामिळनाडू येथे सहभागी विद्यार्थी – विशाल जाधवर, यश गायकवाड, सोहम लोंढे, मनकुश माळी, वेदांत शिर्के, ओम थोरात, सोहम कुंभार, साहेब दास, दिव्या चव्हाण, हर्षिका खामकर, नंदिनी चव्हाण, अंकिता घोडके, तन्वी भिसे, कृतिका मगर, शरयू ढमाले, पूर्वा घाडगे व जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत”पुस्तक ऊठलं,खुदकन हसलं” या नाटकातील सर्व सहभागी विद्यार्थी – दिव्या समुद्रवाने, सर्वज्ञा चंद, स्पृहा खणगे, अधिरा मोहिते, आदिराज भिसे, शौर्य नरळे, रणवीर भोसले, सरस्वती शिंदे सर्व विद्यार्थ्यांचे स्कूलच्या वतीने कौतुक करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन शिक्षिका पूजा दाभोळे यांनी केले. स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना स्काऊट मास्तर हेमंत डोईफोडे आणि सुनिता जगताप यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक स्कूल कमिटी अध्यक्ष शैलेश चंद, उपाध्यक्ष रमेश चंद, मुख्याध्यापिका प्रीती खणगे, उपमुख्याध्यापक प्रदीप भिसे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी पालकांनी केली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.