
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आंदोलन…
पुणे: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. 17) आंदोलन करण्यात आले. या वेळी एक धक्का और दो..
औरंगजेब की कबर तोड दो, अशा घोषणा देण्यात आल्या.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करून औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा लावण्यात आला होता.
या आंदोलनात या वेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, संदेश भेगडे, ऋषिकेश भागवत, धनंजय गायकवाड, श्रीकांत चिल्लाळ, सुशांत गाडे आदी उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, औरंगजेबाचे स्मारक किंवा कबर ही भारताच्या गुलामीचे प्रतीक आहे. त्यामुळे ती नष्ट व्हायला हवी. जर शासनाने कारवाई केली नाही, तर कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करू.
नितीन महाजन म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीतून इस्लामिक राष्ट्र बनवण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे ती त्वरित हटवली पाहिजे. अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा इशारा दिला.