
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते:शिक्षक भारती संघटना जुनियर कॉलेज सोलापूर जिल्हा अंतर्गत माळशिरस तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक शिवाजी बर्गे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना तालुक्याचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बर्गे म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन शिक्षक भारती परिवाराने जो विश्वास टाकला आहे, तो पूर्णपणे सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थपणे भूमिका घेऊ तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करू.यावेळी प्रा.महेश डोके,प्रा. महेंद्र बडीगेर उपस्थित होते.