
युद्ध संपवले नाही तर…
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत प्राणघातक हल्ले करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला आहे की जर त्यांनी युक्रेनसोबतचे दीर्घकाळ चाललेले युद्ध संपवले नाही तर अमेरिका युक्रेनला लांब पल्ल्याची टोमाहॉक क्षेपणास्त्रे देऊ शकते.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “जर हे युद्ध संपले नाही, तर मी त्यांना एक टॉमहॉक पाठवेन. टॉमहॉक हे एक उत्कृष्ट शस्त्र आहे, एक अतिशय आक्रमक शस्त्र आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले, मी असे म्हणेन की जर युद्ध संपले नाही, तर आपण ते करू शकतो. तथापि, ट्रम्प पुढे म्हणाले, हे शक्य आहे की आपण ते करणार नाही आणि हे देखील शक्य आहे की आपण ते करू शकतो.
अमेरिका युक्रेनला टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवण्याच्या शक्यतेवर रशियाने चिंता व्यक्त केली आहे. पुतिन यांनी यापूर्वी म्हटले आहे की युक्रेनला अमेरिकेने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा केल्याने मॉस्को आणि वॉशिंग्टनमधील संबंध गंभीरपणे बिघडतील. युद्धाबाबत ट्रम्प म्हणाले, मला खरोखर वाटते की पुतिन यांनी हे प्रकरण सोडवले तर ते चांगले होईल आणि जर त्यांनी तसे केले नाही तर ते त्यांच्यासाठी वाईट होईल. असं म्हणत पुतीन यांना इशारा दिला आहे.