
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना –दिनांक 17/03/2025 रोजी गोंदी पोलिसांना माहिती मिळाली की शहागडं येथे अवैध्य रित्या 05 जनावरे वाहन क्रमांक Mh 23 w 2271 यातून वाहतूक करीत आहेत मिळालेल्या माहितीवरून गोंदी पोलिस स्टेशन चे सपोनी आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे, पोलिस उप निरीक्षक इब्राहिम शेख, पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, गणेश मुंढे यांनी वाहनावर छापा टाकून त्यातील विनापरवाना वाहतूक करण्यात येणारी 05 गो वंशाची जनावरे यांची सुटका केली. सदरची 05 गो वंशाची जनावरे ही दत्तधाम गोशाळा, कुरण येथे जमा केली आहेत. त्यात वाहन चालक नामें सद्दाम लालु कुरेशी राहणार नवगाव तालुका पैठण यास अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असून गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे करत आहे.