
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे प्लास्टिक रस्त्यावर व इतरत्र फेकली जातात. प्लास्टिक हे नष्ट होत नाही त्याचा पर्यावरणावर मोठा परीणाम होतो .त्यामुळे आरोग्याला धोका होत आहे . त्यामुळे सर्वांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावा असे आवाहन उस्माननगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. चंद्रकांत पवार यांनी केले. पोलीस ठाणे उस्माननगर व रुत फाउंडेशन च्या वतीने प्लास्टिक मुक्त परिसर, कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते.या कार्यक्रमात समता माध्यमिक व उच्च विद्यालय उस्माननगर ता.कंधार येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त परिसराची शपथ देण्यात आली. वृक्षारोपण व संगोपनाचे महत्व सांगितले.कायर्यक्रमाला रुत फाउंडेशन चे नागनाथ चौगुले, निखील यादव, पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी, राजीव सोनटक्के, सूर्यकांत मालीपाटील ( पत्रकार ), मुख्याध्यापक गणेश सोनवणे, शिक्षक – बाजीराव पाटील , बळीराम वडजे , बालाजी नवसागरे, बसवेश्वर डांगे, नरेंद्र वारकड, शिवचंद्र वारकड , परशुराम लामदाडे , प्रशांत पवनेकर , ना. न. लोंढे ,सदाशिव सोनवळे , लक्ष्मण सुरकुतलोलू , साहेब राठोड , गणेश बोगेवार ,जेजेराव वाघमारे, माधव स्वामी, सौ. गौतमी कुलकर्णी, सौ. वर्षा देशमुख , प्रतिक देशमुख, शाळेतील कर्मचारी कचरू मुंगल ,शेकापूरे , शाळेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते.