
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड -अशोकराव उपाध्ये
कारंजा लाड:स्थानिक महेश भवन कारंजा लाड येथे दि २२ मार्च रोजी दुपारी १ वाजता मेस्टा संघटनेची विदर्भस्तरीय सभा पार पडली . सभेमध्ये मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांचे हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून विदर्भस्तरीय सभेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मेस्टा संघटनेचे राज्यस्तरीय, विदर्भस्तरीय सर्व पदाधिकारी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सभेमध्ये शैक्षणिक सत्र 2023-24 व 24-25 या सत्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमात मेस्टा संघटनेच्या पदाधिकारी यांच्या शाळांना अमरावती विभाग, जिल्हा, आणि तालुक्यातून प्रथम, द्वितीय, क्रमांक मिळाला त्या शाळेच्या संस्थाचालक बंधूं भगिनीचा डॉ. संजयराव तायडे पाटील संस्थापक अध्यक्ष मेस्टा आणि डॉ. नामदेवराव दळवी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेस्टा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सभेचे प्रास्ताविक अभिजीत देशमुख विदर्भ अध्यक्ष मेस्टा यांनी केले सभेमध्ये आरटीई प्रतिपूर्ती शिक्षण शुल्क, शाळा संरक्षण कायदा, नवीन शैक्षणिक धोरण 2020, आरटीई प्रतिपूर्ती विषयाव्यतिरिक्त मेस्टाशी संलग्नित असणाऱ्या इंग्रजी शाळांच्या समस्या, विदर्भ, विभाग, जिल्हा संघटन बांधणीबाबत यासह अन्य विषयावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली शासनाने राज्यातील इंग्रजी शाळांचे आर्थिक प्रतिपूर्ती शुल्क जवळपास रुपये 3000 कोटी तात्काळ शाळांना अदा करण्यात यावे नाहीतर शैक्षणिक सत्र २०२५-२६ या वर्षापासून आरटीई 25 % मोफत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याकडून शाळेची फी वसूल करण्यात येईल. ज्यावर्षी शासन आरटीई शिक्षण शुल्क शाळांच्या बँक खात्यात अदा करेल लगेच शाळा विद्यार्थ्यांना भरलेली की परत करण्यात येईल असा ठराव सभेमध्ये घेण्यात आला इंग्रजी शाळांना संरक्षण कायदा लागू करण्यात यावा तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020, इंग्रजी शाळांचा स्कूल कोड वेगळा करण्यात यावा. शासन निर्णय दिनांक 11/03/2025 रोजी शासनाने आरटीई 25% मोफत प्रवेशाचे प्रलंबित शुल्क रु. 200 कोटी शासनाने मंजूर केले परंतु त्यामध्ये असे नमूद केले की ज्या शाळांनी आरटीई 25% मोफत प्रवेश प्रलंबित शुल्काबाबत मा. उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेल्या आहेत अशा शाळाना निधी वितरित करण्यात येऊ नये ही अट शासनाने रद्द करण्यात यावी असा मुद्दा रद्द करण्यात यावा आणि शासनाने आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशाचे थकीत शुल्क राज्यातील सर्व शाळांना सरसकट अदा करण्यात यावेत अन्यथा संस्थाचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी चर्चा सभेमध्ये करण्यात आली. आरटीई प्रतिपूर्ती विषयाव्यतिरिक्त मेस्टाशी संलग्नित ईतर शाळांच्या अन्य विषयावर सभेमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. शासनाने महानगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीतील शाळांच्या इमारतीच्या टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे त्याप्रमाणे नगरपरिषद हद्दीतील शाळांना सुद्धा टॅक्स मधून सूट देण्यात यावी टॅक्स फ्री करण्यात याव्यात इत्यादी अनेक विचार सभेमध्ये चर्चा करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन मनीष वडते यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण चौधरी मेस्टा कार्याध्यक्ष अमरावती विभाग यांनी केले. सभेला उपस्थित मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नामदेवराव दळवी, प्रमुख अतिथी म्हणून अनिल असलकर राज्य संघटक मेस्टा, डॉक्टर पुरुषोत्तम जुजगर राज्य सल्लागार, शिंदे राज्य सचिव, विश्वजित चव्हाण राज्य समन्वयक कला व क्रिडा अभिजीत देशमुख विदर्भ अध्यक्ष मेस्टा, संदीप गावंडे विदर्भ उपाध्यक्ष, श्रीकृष्ण गोरडे अमरावती विभाग अध्यक्ष, रामकृष्ण गुंजकर अमरावती विभाग उपाध्यक्ष,
संतोष गडेकर अमरावती विभाग सचिव, सुभाष कोसलगे अमरावती विभाग सचिव तसेच विदर्भातील, विभागातील, सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.