
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
ईश्वरीय विश्वविद्यालय देगलूर शाखेच्या वतीने दि.२५ ते २९ मार्च दरम्यान देगलूर-उदगीर रोडवरील चिद्रावार मिल मैदानावर ‘श्रीमद् भगवद गीता के ज्ञान से खुशनुमा जीवन’ या विषयावर पाच दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे.
देगलूर शहरातील रामपूर रोडवरील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने कर्नाटकातील सिरसी येथील श्रीमद् भगवद गीतेच्या विशेष प्रवचनकार व टी.व्ही.प्रवक्ता बी.के.वीना दीदी व मुंबई येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका व मोटिव्हेशनल स्पीकर बी.के. श्रेया दीदी यांच्या अमोघ वाणीतून दि.२५ ते २९ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ व सकाळी सात ते आठ या वेळेत विविध विषयावर प्रवचन होणार आहे. त्यात २५ मार्च रोजी संध्याकाळी साडे सहा ते साडेआठच्या दरम्यान सामाजिक चिंताओं का आध्यात्मिक समाधान, बुधवारी सकाळी सात ते आठ स्वयं की पहचान, बुधवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ परमात्मा सर्व प्राप्ति का आधार, गुरुवार सकाळी सात ते आठ परमात्मा का सत्य परिचय, गुरुवार सायंकाळी साडेसहा ते साडेआठ स्व दर्शन से आनंदमय जीवन, शुक्रवार सकाळी सात ते आठ सृष्टी चक्र का रहस्य, शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ मन की शांती, शनिवार सकाळी सात ते आठ राजयोग की विधि और सिद्धी, शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ भाग्य बनाने की कलम. आदी विषयांवर विद्वत्तापर्ण व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.असे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देगलूर शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.