
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): शिरुर कासार येथील राक्षसभुवन येथे अवैध वृक्षतोड करुन लाकडांची अवैद्यरित्या वाहतूक करत असतांना गाडी नं. MH14AS8079 लाकडाच्या मुद्देमालासह पकडुन जप्त करण्यात आली. सदर करवाई ही मा.विभागीय वन अधिकारी बीड मा. अमोल गर्कळ यांच्या आदेशाने व वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा एस. एस. काळे यांच्या समवेत फिरती करत असतांना वनपाल ए. एम. देवगुडे व सर्वश्री वनरक्षक एन. के. काकडे, वनरक्षक एस. आर. राठोड, वनरक्षक डी. टी. यदमल, वनरक्षक जी. बी. सानप, वनमजूर लवांडे, शेख, वनसेवक शहादेव पवार, विजय जाधव,पोपट पवार यांनी शिरुर कासार येथील राक्षसभुवन येथे अवैध वाहतूक करणारी गाडी पकडुन कारवाई केली.