
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला २ मार्च पासून सुरू झाला आहे.हा महीना मुस्लिम बांधव पवित्र महिना मानला जातो. उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी सद्दाम पिंजारी यांचे चिरंजीव करीम सद्दाम पिंजारी वय दहा वर्षीय या चिमुकल्या मुलाने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला.त्याबध्दल करीम पिंजारी चा मुस्लिम धर्मातील बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लाममध्ये कलमा , नमाज , रोजा , जकात , हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे . रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे ( उपवास ) करतात . मोठ्यासह लहान लहान मुल ,मुलीही रमजानचे उपवास करतात. यंदा २ मार्च पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली. उन्हाची तीव्रता वाढत आहे. एवढ्या तापमानात दहा वर्षीय करीम पिंजारी याने पहिला रोजा पूर्ण केला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सहा सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचे उपवास धरत नाहीत. पण करीम पिंजारी याने पहिला रोजा करण्याचा हट्ट करून तो यशस्वी पणे पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी इफ्तार च्या वेळेवर करीम पिंजारी यास नविन कपडे , हार घालण्यात आले. पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल गावातील मुस्लिम बांधव, सगे सोयरे यांनी करीम पिंजारीचे कौतुक केले व अभिनंदन केले.