दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )
नांदेड / उस्माननगर :- लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव येथे फिर्यादीस जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्यानी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीघा विरोधात उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार,
दिनांक २०.०३.२०२५ रोजी १२.३० वा. चे सुमारास मौ. जोमेगाव ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील
आरोपी नामे १ . प्रल्हाद शेषेराव शिंदे,२ . परमेश्वर प्रल्हाद शिंदे, ३. रामेश्वर प्रल्हाद शिंदे सर्व रा. जोमेगाव ता. लोहा जि. नांदेड यांनी संगणमत करून फिर्यादीस जुन्या भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्यानी व काठीने मारहाण केले व गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला. व जीवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी देवानंद जयसिंगराव गाडे, वय २७ वर्षे, व्यवसाय शेती रा. जोमेगाव ता. लोहा जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे उस्माननगर गुरनं ५१ /२०२५ कलम १०९ (१), ११८ (१), ११५(२),३५२,३५१ (२), (३).३(५) बीएनएस-२०२३ कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुर्यवंशी, हे करीत आहेत.