
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी दिघी पिंपरी चिंचवड- धनाजी साठे
दिघी :- दि २१ मार्च रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात नोंदणी झाली.
दिघी भोसरी मध्ये गेल्या २५ वर्षापासून भारतीय संगीत कलेचे,
ताल व सूर या दोन्ही विषयाचे सर्वोत्तम मार्गदर्शन देणाऱ्या,
श्री गणेश चं. पुरवार यांची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात नोंदणी झाली आहे.
गुरुवर्यांना संगीतकाला क्षेत्रामध्ये मंच प्रदर्शन, विद्यालय, महाविद्यालय, स्वतंत्र क्लास आणि भजने शिवाय कईक कलावंत यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेताना दिसून येते.
गुरुजींनी घेतलेला कठीण परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न या मधून दिसून येतो.
याव्यतिरिक्त गुरुजींचे मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनिक चर्चेमधून असे दिसून येते की, गुरुवर्य यांची कार्यप्रणाली संदर्भात शब्द कमी पडतात.