
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
भोयर – पवार समाजाचे आदर्श राजा भोज यांचा जय घोष खा. अमर काळे द्वारा गुंजला
—————————————-
वर्धा – आष्टी :- ओबीसी सुचीमध्ये भोयर – पवार समाजाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी आज २६ रोजी संसदेत केली, महाराष्ट्रातील ओचीसी सूचीमध्ये समाविष्ट जाती समुहाच्या पहिल्या प्रस्तावात पोवार, भोयर, पवार या जातीची शिफारस आहे. पोवार, भोयर, पवार समाजाला महाराष्ट्र राज्याच्या ओबीसीच्या आरक्षण सुविधाही मिळतात. परंतु केंद्रीय ओबीसी आरक्षण सुविधा मिळत नाही, या विषयी मुंबईतील केंद्रीय ओबीसी आयोग,
पुण्यातील महाराष्ट्र ओबीसी आयोग व महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी मंत्रालय यांच्या उपस्थितीत दोनदा सुनावणी झाली. त्यानंतर जवळपास १५ जातीना केंद्रीय सूचीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाला प्रस्ताव मान्यता देण्यासाठी पाठविला होता. पण, अद्यापही मंजुरी मिळाली नाही. केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीत पोवार, भोयर-पवार समाजासह प्रस्तावीत सूचीतील समाजाला समाविष्ट न केल्यामुळे या
समाजातील विद्याथ्यांना उत्त्व शिक्षणात आरक्षण मिळत नाही. केंद्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून तातडीने या समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार अमर काळे यांनी शुन्य प्रहरात संसदेत केली, मागासवर्ग आयोगाने केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीत समाविष्ट करण्यासाठी सादर केलेल्या शिफारस प्रस्तावात बडगुजर,
सूर्यवंशी गुजर, लेब गुजर, रेव्हा गुजर, रेवा गुजर, पोवार भोयर-पवार, केपवार, मुत्रार केपवार, मुजार कापू तेलंगाना, तेलंगी, पेटारेड्डी, रुककरी, लोध-लोधा-लोधी व डंगारी या जातीचा समावेश आहे. हयाबाबतीत तातडीने निर्णय घेण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी करीत भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘जय राजा भोज’ असा जयघोष केला. आजपर्यंतच्या संसदेच्या इतिहासात प्रथमच खासदार अमर काळे यांचेकडून ‘जय राजा भोज’ असा जयघोष केला गेला. हे विशेष!